शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

opprresor आणि oppressed

मी एक वोर्कशॉप केलं, दहा दिवस झाले असतील, "theatre of the oppressed" असं होतं ते. हुकूम शाही विरोधात वगैरे भाष्य करण्या करता ह्याची स्थापना झाली किव्हा संकल्पना आली... communists नन्तर हुकूमशाह होतात म्हणा. ह्याचा उद्देश असा आहे कि एक opprresor असतो आणि एक oppressed , म्हणजे अन्याय करणारा आणि अन्यय झेलणारा , सहन करणारा. 

नाटक - स्टेज हे माध्यम घेऊन लोकांना प्रबोधन न करता त्यांच्यात  जाणीव निर्माण करून द्याची, तसही उपदेश करणं फार सोपं असतं.  स्टेज म्हणजे कुठे हि असू शकतं अगदी रस्त्यात, चौकात कॅन्टीन मध्ये आणि नाट्यगृहात सुद्धा.  तर कलाकार एक विषय घेतात , ज्वलंत किव्हा लोकांना भिडणारा, रोजच्या आयुष्यात रोज दिसणारा आणि लोकांना किव्हा जनते समोर करून दाखवायचं आणि त्यांना विचार करू दयायचा त्यांची उत्तर त्यांनाच शोधू दयायची. 

एक उधाहरण देतो, जे आम्ही केलं . "The last seat on the last bus"* असा तो विषय होता. म्हणजे रात्री ची शेवटची बस मध्ये एक बाई चढते, सगळी बस रिकामी असते, पण ती शेवटच्या सीट वर जाऊन बसते. पुढल्या स्टॉप वर एक माणूस चढतो आणि त्याला तिच्या शेजारी जाऊन बसायचं असतं आणि तो जाऊन बसतो ... असा तो पहिला सिन. तिथं कट करायचं आणि मग लोकांना विचारायचं कि तुम्ही काय कराल ? मग प्रेक्षकातुन एक एक बाई येते आणि ती बस मधली बाई काय  काय करू शकते हे दाखवते. त्या पुरुषाने मग त्या प्रमाणे रिऍक्ट करायचं. ती बाई अर्थातच opressed आणि पुरुष oppressor, हि अशी संकल्पना. 

तर ह्यात ती बाई बदलतजाते, पुरुष नाही , पण खऱ्या आयुष्यात पुरुष पण बदलणार , म्हणजे oppressor  बदलणार. पण ह्यात सगळा फोकस बाई वर होता, तिने असं वागायला हवं तसं करायला हवं वगैरे, चांगलं होतं एकूण.  मला पण काम करून बरं वाटलं , थोडा अस्वस्थ झालो मी पण , बघायला करायला अंगावर आलं सगळं कारण हे जग असं आहे , असं होतं असं असेलही पुढे हा विचार आला. 

मग रुटीन मध्ये आलो आणि सगळं विसरलो गेलो असलो तरी मनात ते फार लागून राहिलं . हे इतकं सरळ सोपं काही नसतं हो आयुष्य असं सारखं वाटत राहिलंय . आपण लेबलं फार लावतो आणि मोकळं होतो. हाच oppressor  आणि हीच ओप्रेसीडे वगैरे म्हणजे एकूण समाजात एक घटक असा आणि एक तसा. ती इस्राएल ची बातमी वाचली , पॅलेस्टाईन आता मोकळं झालं , इस्राएल ने सैन्य मागे घ्यायला सुरवात केली त्यांची ओलीस असलेली माणसं दोन वर्षांनी सोडली... आनंदी  आनंद वगैरे नसलं तरी थोडं चला सुटलो असं झालं ... जगाला. मग फ्रान्स ने लगेच आम्ही पॅलेस्टाईन ला मान्यता देतो वगैरे केलं , इस्राएल चा निषेध आधीच जगाने केला होताच. इथे इस्राएल अगदी क्लिअर कट oppressor आणि पॅलेस्टाईन oppressed  हा सरळ हिशोब जगाने मांडला.  दुसऱ्याच दिवशी हमास ने दहा बारा लोकांना भर चौकात गोळ्या घालून मारलं , अजूनही मारत असतीलच आणि आता प्रेस वाले परत आपल्या घरी गेले म्हणून बातमी कळणार नाही.  पण आधीही हे होतंच होतं आपण oppressor वर लक्ष देत होतो म्हणून oppressor दिसत होता आता जगाला माहित असलेला दिसत असलेला गेला म्हणून oppressed कडे दुर्लक्ष केलंय. 

इथे आपण एक oppressor गृहीत धरला आणि तो गेला म्हणून आता जे oppressed आहेत ते आता छान जगतील असं गृहीत धरलं , आता पंचाईत अशी आहे कि हमास ला जर तुम्ही oppressor केलंत तर वेगळेच प्रश्न येतील समोर. कारण जेव्हा इस्राएल मध्ये येऊन हमास ने लोकांना मारलं आणि काही लोकांना धरून घेऊन गेले तेव्हा oppressor नक्की कोण होतं? मग त्या नन्तर दोन वर्ष झालं तेव्हा कोण होतं? 

गेल्या दहा दिवसात आणि त्या आधी मोठे नक्सलवाडी शरण आले, कारण सांगताना असं होतं कि आता ते युद्ध संम्पल purpose संपला . कारण  जेव्हा नक्सलवाडी  जनमाला आले तेव्हा सरकार कडून शोषण होतं, पण नन्तर असं झालं कि लोकांचं शोषण सुरूच होतं oppressor बदलला. 

त्या मुळे ठळकपणे हाच oppressor आणि हाच अन्याय सहन करणारा असं नाही ठरवता येत ना ? म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणतो मी. बाई चा त्रास हा अगदी क्लिअर कट आहे आणि जगात कुठे हि आहे, वरच्या उदहारण अगदी क्रेकट आहे.   पण इतर वेळी बाजी पलटली असेल ना?

आपण सगळं जग पांढरं आणि काळं म्हणून पाहतो ग्रे काहीच नाही , पण ग्रे प्रत्येक वेळेस असतंच का? शेक्सपियर म्हणतो सगळं ग्रे आहे आपण म्हणतो... मी शहरात राहतो मला सगळं हाताशी आहे, शेजारी कोण आहे हा भेद भाव नाही पण म्हणजे भेद भावच नाही असं नाही म्हणू शकत ना मी . मला नीट कळतंच नाहीये का जगात काय होतय ते? आपण चुकतोय का oppressor ठरवण्यात का सगळं फोकस हा फक्त oppressor  आहे. 

आपण एकूण सगळं पुन्हा एकदा पडताळून पाहायची वेळ आली आहे , वरची दोन उदहारण ताजी म्हणून दिलीत, उद्या अजून काही होईल आणि एक म्हणजे आपल्या मानण्यावर आहे ना? oppressor कोण आहे ते? किव्हा oppression म्हणजे काय ते ? 

*"The last seat on the last bus" हि गोष्ट Augustin Boal च्या पुस्तकात आहे असं आम्हाला रवी म्हणाला , रवी म्हणजे  आमचा  facilitator .