आमने सामने :
बरेच दिवस (महिने,वर्ष.. ) माझ्या बकेट लिस्ट मध्ये आमने सामने होतं, पण योग काही येत न्हवता एक म्हणजे ठाण्यात फार प्रयोग न्हवते लागत आणि लागला कि एका दिवसात पहिला दहा रांगा गेल्याच म्हणून समजा पण शेवटी नाटक पाहायचा योग्य आलाच.
एक अतिशय नाजूक विषय थोडा बंड खोरीचा अगदी contemporary. एवढं असून सुद्धा अप्रतिम सादरीकरण साधा सेट सगळं साधं पण अप्रतिममांडणी . उत्कृष्ट अभिनय (आमच्या बोरिवलीच्या लीना भागवत नि सगळ्यात बेस्ट केलंय हे सांगायला नकोच) आणि खूप छान फ्लो. कुठेही भडक नाही melodrama नाही अचूक भावना टिपणारा आणि विषयाला धरून ठेवण्याची अचूक सांगड. हे सगळं जमून आलेलं नाटक म्हणजे आमने सामने
जुनं नवीन वाईट चांगलं ह्याचा खूप सुंदर मेळ घातला आहे , अमुक एक रूढी म्हणजे बरोबर अमुक म्हणजे चूक हे कसं चूक आहे हे फार छान दाखवणारी एक उत्तम कलाकृती. मला खूप मोह होतोय स्टोरी सांगायचा पण तो मी टाळतोय.
हे नाटक तरुण मुला मुलींनी माध्यम वयीन मुला मुलींनी आणि ज्यांना तरुण मुलं मुली आहेत त्यांनी आवर्जून आणि एकूण सगळ्यांनी स्टोरी दिगदर्शन आणि अभिनय ह्या करता नक्की पाहावं.
सगळ्या टीम चं खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा