आता मात्र फार झालं ....
दहा बारा वर्षान पूर्वीची गोष्ट असेल, आम्ही कोकणातून कोल्हापूर मार्गे येत होतो गाडीने, तेव्हा माझी लेक ५ का ६ वरशाची असेल आणि गाडी पण लहान होती, (अगदी गुणी होती अजिबात कटकट नाही रड नाही हट्ट नाही) आधी दोन चार तास छान गेले, तिनी थोडी झोप काढली मग बाबा कधी येणार घर? हा प्रश्न म्हटलं खूप लागेल आठ दहा तास तरी लागतील, मग तिला मी ते बोर्ड दाखवले मुंबई अमुक एक किलोमीटर चे आणि त्याने अंदाज बांधायला सांगितला , पण का कुणास ठाऊक ट्राफिक लागत गेलं आम्हाला, पण तिने बिचारीने हू का चू नाही केलं, जीव रमवायला तिने स्वतःला गोष्टी सांगितल्या , गाडीतल्या फडक्याने आतून गाडी साफ करते म्हणाली, ते झालं तरी मुंबई काही येई ना, मग आम्ही ब्रेक घेतला, एक्सप्रेस वे वरून पटकन आलो आणि मुंबईत परत ट्रॅफिक आणि मग कस झाल कि मुंबई आली आणि ते किलोमीटर पण कमी झाले, पण घर काही येई ना, बाबा ... बाबा ... किती वेळ? मी हि खेकसलो, मग तिचा चेहरा आणिक छोटा झाला, मग मलाच माझा राग आला, मग बाहेरच्या वर ओरडलो, (ती विसरली मी नाही विसरलो) अस मजल दर मजल करत अगदी घरा पाशी आलो, तिलाही आता रस्ता ओळखीचा होता आणि घर अगदी एक किलोमीटर होत म्हणजे आपण आता आलोच हे लक्षात आल होत आणि परत, हे ट्रॅफिक लागलं , एकदम माझी मुलगी मला म्हणाली आता बस बाबा, हे खूप होतंय खूप त्रास दिला ह्या लोकांनी आता आपण जाऊया चालत .... आता मात्र बस्स ... इतका हसलो ना .. नशिबाने ते ट्रॅफिक लगेच सुटलं म्हणा आणि पाचव्या मिनिटाला आम्ही बिल्डिंग मध्ये, तिच्या चिडून बोलण्या मुळे फरक पडला का कोण जाणे ? सध्या मला हे असं झालं आहे , आम्ही गप गुमान निमूट पणे सगळं सहन केलंय ना? आता बस्स ...
हा जंतू काही जात नाही इथून अजून थोडे दिवस, महिने वर्ष, आपण आता काळजी घेतोय .हो ना? आता थोडं बाहेर पडूद्या कामाला तरी. ... १७ ला उघडणार म्हणताय, मग परत लोक गर्दी करणार, मग परत तुम्ही बंद करणार .. त्या पेक्षा हळू हळू थोड्या थोड्या लोकांना बाहेर येऊ द्या... आमच्या गरजा पण सरकार ठरवतंय (हे लै होतंय), म्हणून पंखे आणि ac विकण्याचं दुकान बंदच , पण दारू चालू केली..(काय लॉजिक असेल?) लोकांना थंड वाटावं आणि सरकारी तिजोरी गरम व्हावी म्हणून, एक तर दारू बंदीला माझा विरोध आहे (आणि पंखे विक्री बंद केली त्याला पण) अरे स्टेशनरी पण बंद? का लोक काय गर्दी करून पेन घेणार? आहो गरजेला पेन लागत, मुलं घरी आहेत पुस्तक, वह्या, कागद, टेप, गम, स्टेपलर, रबर, खोड रबर, पिना (मारायला नाही) फोल्डर, फाईल, अनेक गोष्टी लागतात ...आणि हे लागतं हो ..रोज नाही लागल तरी गरजेची वस्तू आहे. आता पंखा बंद पडला तर माणूस उकाड्याने मरेल, पण कुणी तरी ठरवत कि जेवण फक्त गरजेचं उन्हाळ्यात पंखा नसला तरी चालेल, आता पंखा विक्री चालू केली तर काय लोक तो गळफास लावायला वापरतील हि भीती आहे का सरकारला? मार्च सरला, एप्रिल एकदाचा रखडत खरडत पार पडला मे आला आता जीव जातोय उकडून त्यात ट्यूब गेली आहे खूप जणांची, तरी अंधार चालेल, जेवायला मिळतंय ना? अरे? काय चाललंय काय? रोटी कपडा मकान हा प्रश्न खूप साऱ्या लोकांनी सोडवलाय, चार दिवस नाही मिळाली भाजी तरी वरण भट उसळ पोळी पिठलं भाकरी (किती भारी मेनू बघा भाजी वीणा ) किव्हा पोहे खाऊन सुद्धा जगतील लोक पण पंखा एक मिंट बंद करून बघा ... तर पंखा फक्त प्रतीकात्मक आहे. अश्या खूप गोष्टी आहेत .. काही लोक फक्त अती श्रीमंत आणि अती गरीब लोकांचे प्रॉब्लेम्स बघतात .. मध्यम वर्ग ? त्याला गृहीत धरलाय ... आता बस्स ...
माझे दोन चार प्रश्न वजा सल्ले आहेत (हे आपले मलाच), एक तर होम डिलिव्हरी फक्त जेवण (काय जेवण जेवण चाललंय कोणास ठाऊक )बाकीचं काही नाही का? आता तोच माणूस भाजीची डिलिव्हरी करणार आणि तोच कागद आणि पेन, पण नाही (आम्ही pain सहन करायचा पण पेन नाही मिळणार) .. आता माझी बहीण चित्रकार आहे तिला रंग हवेत, पण नाही ते विविध रंगाची भाजी खा म्हणतात (बळी राजाचा बळी जाईल... ) पण रंग नाही देणार , (नाही म्हणजे नाही ..) आता ती काय फावल्या वेळेत राज्यकारण्यांच्या पोस्टर ला काळं फासणारे (इच्छा असो वा नसो)? आता हॉटेल बंद, बर डिलेव्हरी चालू करा तर ती स्वीगी आणि झोमॅटो ... बार आहेत त्यांना डिलेव्हरी का नाही करुदेत? ती पोर नुसती बसलीयेत त्यांना काम मिळेल empty mind is a devil's workshop . दारू दुकान बंद होती ती उघडली तर झुम्बड .. ती होणारच , (अमेरिकेत पण गर्दी असते) त्या पेक्षा त्यांना पण डिलेव्हरी चालू करू देत , फार तर बाहेर एक डबा ठेवा लोक त्यात आपली ऑर्डर लिहून टाकतील, फोन नंबर लिहितील , तो माणूस देईल घरी आणून, फक्त फोन वर ऑर्डर घ्या, रिक्षा ठेवा डेलिव्हेरी ला, ५० रुपये जास्त घ्या, लोक देतील, रिक्षावाल्यांना पण काम मिळेल, ती लोक भिकारी नाहीयेत, खूप दिवस लोकांच्या दयेवर नाही जगू शकणार, त्यांचा कॉन्फिडन्स नका घालवू काम करू द्या. गर्दी करायला भाग पाडता आणि परत ढुंगणावर फटके मारता , जी लोक ह्यांना (दारू च्या रांगेत उभे राहणाऱ्यांना )हिणवतात तीच लोक, वाण्या कडे गर्दी करून सामान (एक्सट्रा)स्टॉक करत होती ......
सरकारला प्रॉब्लेम्स आहेतच, मी असं म्हणत नाहीये कि सगळं मोकळं करा , तुम्ही हवी ती, हवी तेवढी काळजी घ्याच, पण घरात सगळं उपलब्ध करून द्या... अत्यावश्यक म्हणजे फक्त जेवण नाही.
सरकारला प्रॉब्लेम्स आहेतच, मी असं म्हणत नाहीये कि सगळं मोकळं करा , तुम्ही हवी ती, हवी तेवढी काळजी घ्याच, पण घरात सगळं उपलब्ध करून द्या... अत्यावश्यक म्हणजे फक्त जेवण नाही.
१७ ला एकदम उघडलं तर लोक सगळी एकदम बाहेर सांडतील (मग दांडे कमी पडतील पण.. )त्या पेक्षा थोडं थोडं लोकांना बाहेर सोडा कारण १७ लाच फक्त केलत तर परत मोठा प्रॉब्लेम, शाळे मध्ये कस करतात? एक- एक वर्ग सोडतात, शाळा सुटल्यावर, नाहीतर चेंगरा चेंगरी होईल ना? तस करा शनिवार पासून दुकान उघडा (पंखा , AC , ट्यूब ) रविवारी थोडं हॉटेल ला सूट द्या, सोमवारी एरिया प्रमाणे रिक्षा चालू द्या ओला उबर चालू करा, त्यांना नियमात बांधता येत, घरी जाऊन लोकांना रिपेर ची काम करू द्या , घरातल्या लोकांना सांगा तशी दक्षता घ्यायला , आता सवय झाली आम्हाला काळजी घ्यायची आणि करायची. आता वेड्या सारखं खरंच नाही वागणार ..
power corrupts and absolute power corrupts absolutely .. आता तर काय झालंय ना कि बिल्डिंगच्या सेक्रेटरी ला पण पावर आली आहे, एरवी शिव्या खाणारा माणूस तो बिचारा आता तो म्हणेल तस , दरवाजा बंद कोई नाही आयेगा कोई नही जायेगा.... असं पावर काही लोकांना दिलंय त्या मुळे काय झालय कि, काही लोक त्या मुळे त्याचा गैर वापर करू लागली आहेत ... (साला पंखा दुकान बंद?).
आता हा व्हायरस राहणार आहे, त्याच्या बरोबर जगायला शिकायला हवं, नुसतं किती वर्ष घरी बसणार. अजून? लस यायला ८ महिने लागतील किमान, तो पर्यंत काय? एक वाक्य आठवलं "इतना भी मत डराव कि साला डर का डर हि खतम हो जाये" लोक शांत आहेत कारण ती अजून तरी गुणी आहेत, लोकांचा फार अंत नका बघू. आम्ही शहाण्या सारखं वागलोय ना आता सरकारनी पण शहाण्या सारखं वागायला हवं ... (हसू नका.. मी सिरिअसली बोलतोय).
आम्ही आता घर साफ केलं आहे, सगळ्यांशी गप्पा मारल्या आहेत (मी पोळ्या सुद्धा शिकलोय), नवीन छंद ट्राय करून पाहिलाय, वाचन केलंय, झोप काढलीये, मदत सुद्धा केली आहे (गरिबा पर्यंत पोचली असेल अशी अपेक्षा करतोय)आणि घरा पासून ३०० मीटर च्या आत फक्त फिरलोय, ते पण सामान आणायलाच, मित्रां बरोबर पार्ट्या सुद्धा नाही केल्या (बिल्डिंग मधल्या पण) , म्हणून विचारतो .. कधी जाऊ आम्ही बाहेर?
डॉक्टर , बाकी मेडिकल पॅरा मेडिकल , सफाई कामगार, पोलीस , वाणी वाले , भाजी वाले ट्र्क ड्राइव्हर आमचे वॉचमन दूधवाले पेपर वाले ...आणि अशी बरीच लोक ... ह्यांना मोठा सलाम ... खूप स्तुत्य आहे सगळंच मानलं त्यांना ..
पण आम जनतेचं पण कौतुक आहे (लहान मुलांचं तर फारच), गरीब कामगार , कष्टकरी वर्ग ह्यांना पण सलाम १३० करोड लोक आहेत, त्यातली ०. १ टक्का लोकं पण नियम मोडत नाहीयेत म्हणजे किती कौतुक बघा , आत्ता पर्यंत आम्ही सरकारच ऐकलं , उभे राहा- उभे राहिलो , दिवा लावला - दिवा लावला , घरात बसा.. बसलो टाळ्या पिटा ... पिटल्या आता आमच जरा ऐका .. कुणी ऐकतय का?
सागर कुलकर्णी
ता.क
ते जरा पंखा आणि AC च तेवढं बघा जमतंय का ?
सागर
सागर