एक अतिशय निर्बुद्ध आणि संताप जनक मेसेज सध्या येतोय तो म्हणजे ब्रिज पडला बुलेट ट्रेन बंद करा , त्यांना सांगा आधी ब्रिज बांधावा म्हणाव, हीच लोक असं हि म्हणाली "कशाला हवा काम्पुटर ?" आणि मग स्वतः आरामात तेच काम्पुटर शिकून फारेनला जाऊन बसली विदेशी पासपोर्ट घेऊन . तुम्ही जर विदेशी पासपोर्ट धारक आहात तर तुम्ही मुळात भारतीय नाही राहिलात मग तुम्हाला अजिबात हक्क नाहीये तुम्ही तुमच्या देशाबद्दल बोला. लोक जी मेसेज पाठवतायेत त्याच लोकान पैकी आहेत ज्यांनी पूल पडला पळा पळा केलं . नुसता मास हिस्टेरिया , पण हे सुशीक्षीत लोकान कडून यावं? आता सुशिक्षित आणि सुसंस्कृत ह्या मध्ये फरक आहे म्हणा, जसे मोदींवर आंधळं प्रेम करणारे लोक आहेत तशीच आंधळा द्वेष करणारी पण आहेत, (पण त्यांच आंधळं प्रेम लल्लू वर आहे किव्हा पप्पू वर हे नक्की ) हा आंधळा द्वेष मोदी नसून कधीकधी देशावर सुद्धा होतो हे लक्षात सुद्धा येत नाही. स्वतः ग्रीन कार्ड किव्हा युरोपचा पासपोर्ट , पॅरिस ते लंडन थाळीस (बुलेट ट्रेन) मधून प्रवास केला आणि कस इंडिया मध्ये हे होऊच शकत नाही हे सल्ले देणारी माणसं आता बुलेट ट्रेन ला विरोध करायला लागलेत ...... ही सगळी अती हुशार माणस , अक्कल मात्र नाही , मराठी पणाचा खोटा अभिमान सावरकरांना नाव ठेवलीत कि चालतं (आवडतं ) आणि एक मराठा साठी पाठिंबा, स्वतःच्या पोरांना मात्र इंग्रजीत बोलायचं हा हट्ट .
आमच्या एरिया मध्ये एका पानाच्या दुकाना बाहेर एक माणूस रोज पान खातो आणि तिथेच थुंकतो आणि म्हणतो बुला मोदी को साफ करनेको , काही लोक हसतात आणि बरोबर आहे म्हणतात साला मेरे को बोलताय स्वछ भारत नाही करताय जा भाडं में , तो त्याच बिल्डिंग मध्ये वर राहतो , म्हणजे रोग झालाच थुंकण्या मुळे तर त्यालाच किव्हा त्याच बिल्डिंगच्या लोकांना होणार. अशी लोक आहेत जे मुदाम चाइनीस वस्तू घेतात साला मेड इन इंडिया काय? बंद करेगा सब ....
तोच ब्रिज काय? असे अनेक आहेत , कित्त्येक वर्ष तसेच आहेत, अतिशय वाईट झालय पण हे अस होणार नाही ह्याची आपणच नको घ्यायला ? बेशिस्ती खूप वाढलीये आणि मास हिस्टेरिया त्या मेसेज सारखा, रस्त्यात सगळ्यांना आधी पुढे जायचं असत. त्या दिवशी ते स्पाईस जेट च विमान थोडं विमान पट्टीच्या पुढे गेलं तर आतल्या एका माणसाने लिहिलं होत कि काही पुरुष,, लहान मूल, बायका , म्हातारी माणस ह्यांना ढकलून पुढे गेले , बस मध्ये धावत जाऊन बसले आणि लहान मूल पावसात कुडकुडत उभी , हीच लोक बुलेट ट्रेन नको बंद करा चे मेसेज पाठवतात , अक्कल नाही स्वतःची , नुसता मोदी द्वेष. स्वतः काय करताय? ब्रिज गिरगाया म्ह्णून बोंबा मारायच्या आणि स्वतः लोकांना ढकलून चिरडून पुढे.
एक तर जापान तुम्हाला साधे पूल बांधायला पैसे देत नाहीये आणि कर्ज पण माफक दरात, होऊ दे कि चांगली गोष्ट प्रॉब्लेम काय आहे? माझा जन्म मुंबईचा (पासपोर्ट पण भारताचाच आहे अजून तरी ) ट्रेन च्या प्रवासाची सवय, जवळ पास वीस वर्ष ट्रेनेच प्रवास केलाय सध्या ऑफिस ते घर हा प्रवास रस्त्याने जवळ पडतो म्हणून स्कुटर . सांगायचं मुद्दा असा कि मी ट्रेनने प्रवास केलाय आणि तो आत्ता किती घातक आहे हे सांगू शकतो . घटक असल्याचं मुख्य कारण म्हणजे बेशिस्त , त्या साठी तुम्ही काय कराल? पुण्यात तुम्ही हेल्मेट पण नाही म्हणता घालणार आणि गप्पा कसल्या करता इंग्लंडच्या? आणि कसंय ना? एकदा सरकारवर ढकलले की बास आपण मोकळे. एका मुर्खाने तर मला, शिवसेनेने कस पत्र पाठवलं होत? ते पाठवलं. अरे तुम्ही सरकार मध्ये आहात दोन्हीकडे , परळ दादर एरिया तुमचा आहे , एक हि वीट बंधू देणार नाही ही अक्कल आधी न्हवती का?
का वाट पाहत होतात? शाईन मारायची? ब्रिज बांधला असता तर नुसत एक पोश्टर लावलं असत "सदर पुलाच काम अमुक अमुक ने केलं " काय उपयोग? आता बघा सगळी मीडिया येईल आणि आता तर बुलेट ट्रेन चा विरोध म्हणजे सगळे वीरोशी पक्ष वाले एकत्र येणार ....
आपणच एक पण करूया कि ह्या पुढे ब्रिज पडला अस व्हाट्सअप वर पण नाही करायच, अक्कल दिली असेल देवाने तर ती वापरून मेसेज वाचूनच पुढे करा ... खूप फरक पडेल फक्त ह्या करता तुम्ही लॉजिक वापरलं पाहिजे आणि भारतीय नागरिक हवात (नुसतं राष्ट्र गीताला उभं राहील म्हणजे देश भक्ती नसते राव ), झालंच तर ज्याच्या कडून हा मेसेज येईल त्याला परत पाठवून उलट तपासणी करा ... पुढे आणि दुसऱ्यावर ढकलण्या पेक्षा एकदा पाठी वळून पहा ....