हल्ली रस्त्यात गणपती बाप्पाचे चे पंडाल आणि नेत्यांचे आणि बऱ्याच ऐऱ्या गैऱ्याचे पोस्टर्स लागले आहेत, सगळयात डोक्यात जात ते म्हणजे तिवारी, पांडे , शुक्ला , यादव , सिंग हे हात जोडून पोस्टर्स वर माझ्याच मुंबईत माझ्याच बाप्पाच्या घरात माझच स्वागत करत उभे.... अरे तू कोण माझं स्वागत करणारा? एक तर बाप्पा ला "बप्पा" म्हणतात तो एक राग आहेच. उद्या माझ्याच घरी खालचा watchman "आओ आओ आपका घर मे स्वागत है" म्हणेल .... रस्ता घेतला, रिक्षा घेतल्या फूटपाथ तर त्यांच्या मालकीचा आहे असा वटहुकूम सेनापती ह्यांनेच काढलाय अस एकूण दिसतय, आता माझा देव बाप्पा पण? नाही म्हणायला सावंत -चव्हाण -कदम - राणे ह्यांचे सह कुटुंब, सार्वजनिक गणपतीला आमंत्रण देणारे काही फलक त्या गर्दीत दाटीवाटीने उभे आहेत, पण ते दहा वर्षात जातील ...उद्या धोतर सोडून लुंगीत नका रे आणू गणपतीला तो काय त्याच्या वडीलां सारखा नाहीये गुळाचा म्हणून राहील ..... मुंबईला खड्यात घातली आहेच किमान आपल्या विघनहरत्याला तरी सरळ रस्त्याने जाऊद्या ......