वणी च सप्तशृंगीच देऊळ सोडल्यास मी फार आवडीने देवळात जात नाही , नेलं तर ना नसते , पण मुद्दामून जात नाही, मी शॉपिंग मॉल ला पण आवडीने जात नाही. मला सगळ्याच गोष्टींचा धंदा केलेला आवडत नाही. दत्तपाड्याला आम्ही जिथे राहायचो तिथे एक रामाचं देऊळ होत, खूप मस्त मला जाम आवडायचं, आम्ही पावसाळयात तिथे आत खेळायचो , राम नवमी सोडल्यास फार गर्दी नसायची आणि तिथे कीर्तन व्ह्याच, तेव्हा ते अकराला बंद होयच, नुसतं टाळ आणि ढोलक, माईक नाही कि काही नाही खूप प्रसन्न वाटायचं. तेव्हा सुद्धा कुणीतरी तक्रार केली होती आवाज होतो म्हणून. चालायचंच, इलाज नाही, नाव घेत नाही त्या माणसाचं, पण देव धर्म वगैरे करणारा माणूस होता . सांगायचा मुद्दा असा कि मला देवाचा प्रॉब्लेम नाही , मला त्याला विकणाऱ्यांचा आहे , म्हणून मी मोठी देवळ टाळतो , जमलंच तर मुख दर्शन.
मी सध्या निगडीला असतो , प्राधिकरण , मुंबईच्या गजबजाटा पासून दूर , शांत जागा आहे . सगळ आटोपशीर तरी सगळं मिळत आणि फार लांब जाव लागत नाही , मॉल नाहीत अजून इथे, ज्यांना ते आवडत त्यांना इथे नाही आवडणार. माझ्या पायाला भिंगरी आहे, त्या मुले मी सतत इथे चक्कर मारत असतो. खूप देवळ आहेत इथे सुंदर आहेत, पण एरवी मी पायात shoes घालून असतो म्हणून आत जाता न्हवत आला, पाऊस होता त्यामुळे स्लीपर घालणं पण कठीण होत , पण काल संध्याकाळी मी आमच्या समोरच असलेल्या स्वामी समर्थांच्या देवळात गेलो , बाजूला गणपतीच छोटं देऊळ आहे, मला गणपती आवडतो मस्त असतो नेहमी. देऊळ शांत आहे छान तसाच मोठा ओटा स्वामींची मूर्ती एक चार पायऱ्या वर गाभारा आहे तिथेय, गाभाऱ्यात AC वगैरे आहे, तो नक्की कुणा करताय ते ठाऊक नाही, पण देऊळ प्रसन्न आहे बाजूला बाग आहे , खर म्हणजे एक सोसायटी आहे तिची बाग आहे , मस्त आहे हिरवी गार. एक पाच मिंट बसून मी निघालो. बाहेर टाकी आहे पाण्याची एक कुत्र होता बसलेलं , देऊळ साफ करणारी बाई कडे बघून जोरात शेपूट हलवायला लागला, त्या बाईने टाकीचा नाळ उघडून दिला आणि त्या कुत्र्याने मस्त तोंड खाली धरून पाणी प्यायला सुरुवात केली , बाई पण त्याला काही तरी बोलली कानडीत ....
मला आठवलं कि पाठी एक मारुती मंदिर आहे दक्षिण मुखी असं आहे, मला फार सोयर सुतक नाही देवा ने कुठे पण बघाव ,पण असले काही तरी. अतिशय सुंदर असा परिसर आहे, मोठी बाग आत गोल गोल असे पायवाटा, स्वच्छ कुठे घाण नाही कुणी जबरदस्ती करून हातात हार देत नाही, फुलं कोंबत नाही , पेढे नाही , नारळ नाही काही नाही . गेटच्या आत गेलं कि उजवीकडे बाप्पा च देऊळ आहे, मस्त आहे आवार छोटा आहे , बाहेर दोन आज्या आणि एक आजोबा होते , त्याच गप्पा, त्यातली एक आजी बहिरी होती त्या मुळे मला आणि खूप लोकांना सगळं ऐकू येत होत. गणपती पूर्व पश्चिम होता. त्या देवळाच्या थोड्या पुढे मारुती मंदिर , छान छोटे खानी रस्ता बाग, सहाच उन्ह , पाठी लहान मुलांचा प्ले एरिया , मोठी मूल (मुलीचं होत्या जास्त ) मस्त त्या बागेतून बागडत होती (अनवाणी ). मेन गेट पासून देऊळ पन्नास फुटांवर आहे मध्ये बाग हिरवीगार , आजूबाजूला छोटीशी घर आणि झाड , त्यातून हलके सूर्य किरण येत होती आणि संध्याकाळचा एक छान सुवास. हे देऊळ थोडं मोठय , म्हणजे बरंच , एक वीस बावीस पावलांचा तो ओटा मग गाभारा, देवळा सारख देऊळ , पण हल्ली देवळा सारख देऊळ दिसत कुठे? छान आहे कोरीव मूर्ती, पण आमच्या इथे बोरिवलीला एका हातात मोठा डोंगर आणि दुसऱ्या हातात गदा असलेली शेंदूर फसलेली साईड पोझ वाली मूर्ती आहे त्या मुळे असा रेखीव हनुमान मी पहिल्यांदाच पहिला , मी फार देवळात जात नाही त्या मुळे हनुमान असाच असतो अस मला वाटायच एकदम उडणाऱ्या पोझ मध्ये, सगळी देवळ एक तर दत्तपाड्याची लहान पणा पासून पाहिलेली किव्हा वणी तेच ठाऊक आहे मला .
मी देवळात गेलो त्या चार पायऱ्या चढून, रीतसर नमस्कार केला आणि बाजूला माझ्या माहितीतला हनुमान दिसला त्याला मी थोडा जास्त वेळ नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, खूप सुबक देऊळ केलय हे प्रदक्षिणा मारताना दिसलं . तसाच पाठी येत मी अगदी पायरी जवळ भिंतीला टेकून बसलो, डोळे बंद केले खूप शांतता , मधेच मुलांचा आवाज खेळताना , देवळात मुलांचा आवाज खूप छान वाटतो तसाच डोले बंद करून बसलो तेव्हड्यात हलके घंटा वाजली मोठा आवाज नाही छोटा ....टन टन असा ....एक दोन मिनिटाने बाजूला डोळे उघडून पहिल तर एक माणूस होता बाजूला, मला हात जोडून नमस्कार केला मी हि केला , मग गुरुदेव दत्त म्हणाला, मला पण म्हणा असा आदेश सोडला , मी हि म्हणालो. मग बोलायला लागला , जरा वेडसर टाईप्स होता , मग देवाला माणूस करून तो कसा मोठाय ते सांगत्याला लागला ,परत गुरुदेव दत्त म्हणाला , मी पण लागलीच म्हणालो . आपण अश्या लोकांशी वाद घालत नाही , नशिबाने तो पुढे गाभार्या जवळ गेला, तसा मी उठलो , उगाच काही गोष्टी मला पाटल्या नसत्या पण मग माझं शांत झालेलं मन अशांत झालं असत......