आज मला एक अति प्रामाणिक दुकानदार आणि खरा देव भक्त दिसला. वाटेत येताना मला एक देवाचं दुकान दिसल. म्हणजे शटर असलेल दुकान, त्यात अनेक मुर्त्या लाईन मध्ये लावून ठेवल्या होत्या आणि समोर खुर्च्या. किती प्रामाणिक माणूस, लोक हेच करतात आणि त्याला देऊळ अस गोंडस नाव देतात. हा माणूस बघा, सच्चा आणि प्रामाणिक. एक दिवस मी नक्की जाईन आज गाडीत होतो, पार्किंग चा लोचा असतो, कधी स्कूटर वर आलो कि नक्की थांबेन, दुकानात जाऊन दहा बारा रुपये देऊन हक्काने आशीर्वाद घेऊन येईन.