मा श्री उद्धव ठाकरे,
स. न. वि. वि.
कोकणात दोन भावांच्या भांडणात एक शेट दुकान, जागा हडप्तो अस होऊन सुधा दोघ भाऊ खुश असतात कि कशी जिरवली म्हणून . कारण मुळात शत्रू कोण हेच ठाऊक नसतं तस सध्या मला सेना आणि भाजप कडे बघून वाटतंय.
मी गेली पंचवीस वर्ष मतदान करतो आहे, अगदी न चुकता आणि मत कायम युती ला होत त्या मुळे झाल काय कि, ह्या खेपेस कुणाला मत द्यायचं हे कळेच ना कारण मत कायम सेना भाजप अस होत.
पण एकमात्र नक्की कि तुम्हाला सगळ्यांनी मिळून फसवलन आणि तुम्हाला अजून हे लक्षात येत नाही ह्याच आश्चर्य वाटतंय.
जास्त प्रेम, मोह तुम्हाला कसला आहे? सत्ता का राज्य? उत्तर मला नकोय ते मला दिसलंय. पण ह्यात तुमच नुकसान तर झालच पण महाराष्ट्रच जास्त झाल न? साफ गंडवल तुम्हाला, आणि तुमच्या कडे अशी माणसं पण नाही जी लोक ही खेळी ओळखू शकतील. ह्या खेपेस खूप सुवर्ण संधी आली होती तर तुम्हाला सोन्याच अंड नको होत अख्की कोंबडीच हवीशी झाली. प्रत्येक खेपेस पहिलच येणे गरजेच नसत साहेब. आत्ता काय झाला बघा हातातल सोन्याच अंड जाउन नुसतच अंड आल.
शरद पवार साहेबांकडून कडून हे शिकण्यासारख आहे, त्यानी एकाच खेळीत अनेक गोष्टी केल्या …. युती फोडली, भाजप ला लोकांच्या मनातून उतरवल आणि स्वतावरच संकट दूर लोटलं , मानल त्यांना.
आपण साहेब काय केलत? हातातली सत्ता घालवली लोकसभेत मंत्रिपद आणि लोकांचा आदर आणि प्रेम. पवारांची भूमिका तुम्ही घेतली अस्तीत तर? भाजपला हव तेव्हा तुम्ही दंडका देऊ शकला असता , आता अगदी समोर जाऊन बसलाय त्यांना कळतंय तुम्ही काय करणार ते, कधी तरी पाठून मारा, सारख समोर जाउन मारामारी करण्याचे दिवस गेले. आता निवडणूक झाल्या कि काय् होणार आहे अगदी उघड आहे, ते तुम्हाला दिसायला हवय.
तुमचा शत्रू तुम्ही ओळखलाच नाहीत , भाजप हा शत्रू न्हवता कधीच …. तुम्ही समजलात आणि चुकीच्या दिशेने हल्ले केलेते लोकांच्या मनातून उतरलात , आता अस लोकांना शिव्या देऊन नाही चालत, मध्यम वर्गीयांच्या मनातून उतरलात साहेब, कुणाचा बाप वगेरे काढायला हा काही सिनेमा नाही, तुमच वाक्य आणिक कुणी म्हंटल तर? जीवे मारल असत लोकांनी …. मग आपला बाप तो बाप आणि लोकांचा काय?
कुणी टीका केली कि लगेच हाणून (मारून ) नका पाडू , जरा आत्म परीक्षण करा, नवीन लोकांना विचारा (घरच्या नाही ), अजून थोडी असतील आजूबाजूला चाचपडून पहा. शत्रू कडून पण शिकण्यासारख असत हे ध्यानात घ्या आधी शत्रू कोण हे ओळखा …
शिवेसेनेला जशी महराष्ट्राची गरज आहे तेवढीच महाराष्टाला सुधा अजून सेने ची गरज आहे.
आपल नम्र
सागर कुलकर्णी