संजू बाबा :
काल पर्वा मला कुणीतरी म्हणल की संजय दत ला सोडला पाहिजे किती छान काम करतो तो, मुन्नाभाई मध्ये काय मस्त बोलला आहे , म्हंटल खरय, सोडायला हवाय, पण आपण दाउद ला पण सोडू कारण बहुतेक चित्रपट underworld sponsor करतात म्हणे .
आम्ही जेव्हा कॉलेजात होतो किव्हा, नुकतेच बाहेर पडलो होतो, आता आपल्याला सवय झाली आहे म्हणा पण तेव्हा हे नव होत सगळ , म्हणजे अशी लोक मरतात आणि अस लोकांना मारता येत हे मुळी माहीतच न्हवत , फार फार तर वार किया किव्हा वस्तारा घुम्या इथ पर्यंत मजल, सोडा वाटर का बॉटल फोड हे माहिती होत (थोडास पाहिलं होत ) तितकच हो… पण अशी प्रेत पडली आहेत उध्वस्त चेहरे हे पचवायला खूप जड होत , मग मन मेल् आणि काश्याचाच काही वाटेनास झाल , सौव्हीस अकरा झाला, चीड आली , पण खूप हतबल झालो कारण १ ९ ९ ३ साली जे झालो होतो ते परत आठवल आणि दाउद ला आपण काहीच नाही केल हे जाणवल संजू बाबा आता एक स्टार होता हे जाणवलं , आपण एक शंड आहोत आणि आपला राष्ट्र पशु गांडूळ हवा अस पटू लागल होत, मन मेल होत, फक्त वाट पाहत आहोत अस वाटत होत आणि तेच झाल .
मालां अजून आठवत …… एक क्रिकेट च कीट वूखुरलेला एक फोटो पेपर मध्ये आल होता , मेलेल्याला मुलाच वय १४ अस होत , तो कुणीही असू शकला असता …अग्दि सचिन सुधा ……पण आज त्याच काय?
मी तर वाचलो न? मी नशिबाने त्या एकाहि ठिकाणी न्हव्तो , किमान दोन ठिकाणी मी असतो , किव्हा माझे वडील तरी तिथे असते आणि होते फक्त दहा मिनटा नंतर तिथे पोचले , हे सगळ आम्हाला नवीन होत, आज आपण निर्लज्ज झालो आहोत आणि ह्याचा श्रेय जात त्या एका दिवसाला आणि ह्यात तुमच्या संजू बाबा चा मोठा हात होता, त्याला माहिति होत कि त्या गाडीत काय होत? आणि तो @#@##@#@ हे सगळ टाळू शकला असता हा त्याचा मोठा गुन्हा.
आज आपण पैशाल्याला खूप महत्व देतो , पण एकदा तरी निस्वार्थ पणे विचार करावा आणि संजय ला माफ करा असा म्हण्या आधी google करा आणि १९९३ ला शोधां आणि जमल्यास फोटो पहा . आपण जर तेव्हाच हे सगळ ठेच्ल असत न तर बहुदा पुढे काही घडल नसतच …
सगळ्यात आधी देश हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपण अमेरिके पेक्षा पुढे जाऊ …स्वर्थि पण थोडा बाजूला ठेवा (खूप कठीण आहे मला मान्य आहे कारण आपल्याला तेच शिकवलं आहे )आणि नीट विचार करा…
जय हिंद